सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर शहांचे उत्तर; लोकसभेत पिकला हशा (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्यासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात झाली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कलम 370 संदर्भातील चर्चेमध्ये आपले मत मांडले. मात्र त्यांच्या वक्तव्यावर शाह यांनी मजेशीर उत्तर दिल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विशेष दर्जाचा आधार असलेले कलम 370 रद्द करण्यासंदर्भात आज लोकसभेमध्ये चर्चेला सुरुवात झाली. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कलम 370 संदर्भातील चर्चेमध्ये आपले मत मांडले. मात्र त्यांच्या वक्तव्यावर शाह यांनी मजेशीर उत्तर दिल्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
 

कलम ३७० बद्दल बोलण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी काश्मीरमधील नेत्यांशिवाय ही चर्चा अपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) यावेळी त्यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांची आवर्जून आठवण काढली. मी सभागृहामध्ये 462 क्रमांकाच्या आसनावर बसते तर फारूक अब्दुल्ला 461 क्रमांकाच्या आसनावर बसतात. ते जम्मू आणि काश्मीरमधून निवडूण आले आहेत. आज संसदेमध्ये त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये. इतिहासात डोकावून पाहिले तर अब्दुल्ला यांच्या उपस्थितीशिवाय झालेली ही चर्चा कायम अपूर्ण म्हणूनच पाहिली जाईल, असं मत सुळे यांनी व्यक्त केले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सुळे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शाह यांनी त्यांच्याकडे यासंदर्भात स्पष्टीकरणसाठी विनंती केली. सुळे यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना अब्दुल्ला हे स्वत:च्या इच्छेने घरी बसले असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले. फारुख अब्दुल्ला यांना ना ताब्यात घेण्यात आलेय ना त्यांना अटक करण्यात आलीय. ते स्वत:च्या मर्जीने स्वत:च्या घरी बसले आहेत, असे स्पष्टीकरण शाह यांनी दिले. शाह यांच्या या मजेदार स्पष्टीकरणानंतर सभागृहात एकच हशा पिकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Minister Amit Shah Gave Fitting Reply To Ncp Mp Supriya Sule In Article 370 Debate