नोटाबंदीविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून जानेवारीमध्ये देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसकडून जानेवारीमध्ये देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी माहिती दिली. ते म्हणाले, 'नोटाबंदी हा स्वतंत्र भारतातील सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. हा गैरव्यवहार समोर आणण्यासाठी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. हे आंदोलन तीन टप्प्यात होईल. पहिला टप्पा 1 ते 10 जानेवारीदरम्यान, दुसरा टप्पा 11 ते 20 जानेवारी, तर तिसऱ्या टप्पातील आंदोलन 21 ते 30 जानेवारीदरम्यान होईल. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध आणि मोदींवरील भ्रष्टाचाराचे आरोप हा या आंदोलनाचा प्रमुख विषय असेल.'

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिर्ला आणि सहारा यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर 'आम्ही एक साधा प्रश्‍न विचारतो. तुम्ही (मोदी) पैसे घेतले होते का? जर तुम्ही पैसे घेतले नसतील तर या प्रकरणी तुम्ही स्वतंत्र चौकशी का करत नाही?', असा प्रश्‍न सूरजेवाला यांनी उपस्थित केला आहे. नोटाबंदीविरोधातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे देशभर साधारण 15 हजार कार्यकर्ते कार्यरत असल्याचे वृत्त आहे.

Web Title: HomeIndia news Congress to launch nationwide movement to expose ‘real motive’ behind demonetisation Congress to launch nationwide movement to expose ‘real motive’ behind demonetisation