विवाहादिवशीच मुलीची पित्याकडून हत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

अरिकोड येथील मंदिरात अधिराचा विवाह होणार होता, मात्र त्याच दिवशी तिची वडिलांशी याविषयावरुन वाद झाला. त्याच वेळी राजनने अधिराला भोसकले. यात तिच्या ओटीपोटाला गंभीर जखम झाली

तिरुअनंतपुरम - विवाहादिवशीच पित्याने मुलीची हत्या केल्याची घटना केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी राजन (वय 44) याला पोलिसांनी आज (शुक्रवार) अटक केली आहे.

राजन याची मुलगी अधिरा (वय 22) व एका दलित युवकाचे प्रेमसंबंध होते. संबंधित मुलगा लष्करात आहे. त्यांच्या प्रेमाला राजनचा विरोध होता. पोलिसांच्या उपस्थितीत मुलामुलीच्या कुटुंबामध्ये चर्चा होऊन दोन्ही बाजूकडून त्यांच्या संबंधांना मान्यता देऊन विवाह ठरविण्यात आला. राजन यांनी मात्र त्यास मंजुरी दिली नाही.

अरिकोड येथील मंदिरात अधिराचा विवाह होणार होता, मात्र त्याच दिवशी तिची वडिलांशी याविषयावरुन वाद झाला. त्याच वेळी राजनने अधिराला भोसकले. यात तिच्या ओटीपोटाला गंभीर जखम झाली. तिला रुग्णालयात दाखल केले असता तेथे तिचे निधन झाले.

या घटनेनंतर राजन तेथून पळून गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून आज अटक करण्यात आली.

Web Title: Honour killing in Kerala: Man stabs daughter to death