लेकराचा मृतदेह हातात घेऊन बाप चालला 88 किमी...

the horrible reality of corona father carrying the body of a son for the funeral at anantpur
the horrible reality of corona father carrying the body of a son for the funeral at anantpur

अनंतपूर (आंध्रप्रदेश): देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना घरातच बसावे लागत आहे तर काहींना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमध्ये वाहतूक व्यवस्था बंद असल्याने एका बापाला मुलाचा अंत्यसंस्कार करण्यासाठी 88 किमी अंतराची पायपीट करावी लागल्याची घटना येथे घडली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च पासून देशात लॉकडाऊनची घोषणा केली. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. देशातील वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे अनेकांना कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.

अनंतपूर जिल्ह्यातील एका व्यक्तीच्या तीन वर्षांच्या मुलाचे  निधन झाले. हा व्यक्ती आंध्रप्रदेशातील गोरंटला या एका लहानशा गावात राहतो. लॉकडाऊनमुळे येथील सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे लेकराचा मृतदेह हाता घेऊन बाप तब्बल ८८ किलोमीटर चालत गेला. याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com