हॉटेलमध्ये एमआरपीपेक्षा अधिक किमतीत पाण्याची बाटली विकता येणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पाण्याच्या बाटलीवर एमआरपी छापलेली असते. या एमआरपीपेक्षा अधिक दर आकारता येऊ शकत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे छापील किंमतीपेक्षा जास्त दराने पाण्याची बाटली विकणाऱ्यांविरोधात यापुढे कोणतीही कारवाई केली जाणार नाही.

नवी दिल्ली : हॉटेलमधील पाण्याच्या बाटलीवर छापलेल्या किंमतीपेक्षा अधिक दराने बाटली बंद पिण्याचे पाणी (मिनरल वॉटर) विकता येऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिला. न्यायालयाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारने यावर फेरविचार करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून, यापूर्वी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे.

mineral water

हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पाण्याच्या बाटलीवर एमआरपी छापलेली असते. या एमआरपीपेक्षा अधिक दर आकारता येऊ शकत नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे छापील किंमतीपेक्षा जास्त दराने पाण्याची बाटली विकणाऱ्यांविरोधात यापुढे कोणतीही कारवाई केली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एफ. नरिमन आणि नवीन सिन्हा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने ''आमच्या जुन्या निर्णयावर समाधानी आहोत असे सांगितले. तसेच दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अशी कोणतीच गोष्ट आम्हाला आढळलेली नाही. ज्याआधारे आम्ही आमचा मागील निर्णय बदलावा, असेही न्यायालयाने सांगितले.
 

Web Title: Hotel And Restaurant Can Sold Water Bottle Above MRP Price says Supreme Court