Valentine's Day : सिंगल लोकांनी कसा साजरा करावा व्हॅलेंटाईन डे?

सिंगल लोकांनी व्हॅलेंटाईन दिवस कसा साजरा करावा? जाणून घ्या
Valentine's Day
Valentine's Daysakal

Valentine's Day : व्हॅलेंटाईन दिवस म्हटले की प्रेमाचा दिवस. दोन जोडप्याचं प्रेम, अशीच संकल्पना आपल्या मनात असते. या दिवशी नवरा बायको, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करतात पण सिंगल लोकांनी व्हॅलेंटाईन दिवस कसा साजरा करावा, मुळात करावा की नाही? हा प्रश्न ही पडतो.

मुळात व्हॅलेंटाईन दिवस हा केवळ दोन जोडप्यांचा दिवस नसतो तर प्रेमाचा दिवस असतो. हे प्रेम फक्त पार्टनरपर्यंत मर्यादीत नसून इतर गोष्टींना, व्यक्तींना लागू होतं. त्यामुळे सिंगल लोकांना व्हलेंटाईन दिवस साजरा करण्याचे बरेच ऑप्शन्स असतात. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (how should single person celebrate Valentines Day read story)

  • माणसाने स्वत:वर आधी प्रेम करावं, असं म्हटले जाते. जर तुम्ही सिंगल आहात तर तुम्ही तुमच्या प्रती प्रेम व्यक्ती करू शकता. स्वत:साठी क्वालिटी टाईम काढू शकता.

  • याशिवाय तुमच्या आयुष्यात खूप चांगले मित्र असेल ज्यांच्यावर तुमचं खूप प्रेम आहे त्यांच्यासोबत तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.

  • अनेकदा आपण आपल्या कुटूंबाविषयी प्रेम व्यक्त करायला विसरतो. जर तुम्ही सिंगल आहात तर तुम्ही यंदाचा व्हॅलेंटाईन डे घरच्यांसोबत सेलिब्रेट करू शकता.

Valentine's Day
Valentines Day 2023 : यशवंतराव-वेणूताईंचा संसार म्हणजे ‘दृष्ट लागण्याजोगे सारे’!
  • याशिवाय एखाद्या अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमाला भेट देऊनसुद्धा तुम्ही प्रेमासाठी भूकेले असणाऱ्या लोकांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.

  • तुमच्या ओळखीच्या किंवा तुमच्या कॉलनीतल्या लहान मुलांसोबतही तुम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकता.

  • मुळात व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी जितकं जास्त तुम्ही प्रेम व्यक्त कराल किंवा प्रेम वाटाल, शेअर कराल, तितकं तुमच्या आयुष्यात प्रेम भरभरुन येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com