आता घरबसल्या बदलता येणार 'आधार'चा पत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

'युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया'कडून (UIDAI) आता 'सेल्फ सर्व्हिस' उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून आधारकार्डवरील पत्ता आता घरबसल्या बदलता येणार आहे.

नवी दिल्ली : 'युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया'कडून (UIDAI) आता 'सेल्फ सर्व्हिस' उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नव्या सेवेच्या माध्यमातून आधारकार्डवरील पत्ता आता घरबसल्या बदलता येणार आहे.

'यूआयडीएआय'च्या माध्यमातून हा बदल करता येणार आहे. त्यासाठी आधार प्रणालीसोबत आपला मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे आहे. लिंक असलेला मोबाईल क्रमांकावर 'वन टाइम पासकोड' (OTP) प्राप्त होईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया करता येऊ शकेल. 

कोणत्या कागदपत्रांची आहे गरज :

- आधारकार्डवरील पत्ता बदलण्यासाठी सेल्फ अटेस्टेड पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे. 

- बँक स्टेटमेंट/पासबुक

- पोस्ट अकाउंट स्टेटमेंट/पासबुक

- रेशनकार्ड, मतदान कार्ड, वाहन परवाना

- सरकारी ओळखपत्र यांसारखे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केली जायला हवी.  

- असे करा आधारवरील पत्ता अपडेट

- uidai.gov.in वर क्लिक केल्यानंतर आधारक्रमांकाद्वारे रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर लॉग-इन करता येऊ शकते.

- लॉग-इन केल्यानंतर 'update address via address proof' या सेवेच्या माध्यमातून आधारकार्डवरील पत्ता अपडेट करता येणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How To Change Address In Your Aadhaar Card Online