भारताच्या तिरंग्याबाबत पाकिस्तानी नागरिक कसा विचार करतात? पाहा व्हिडिओ

पाकिस्तानमधील एका युट्यूबरने पाकिस्तानच्या लोकांच्या तिरंग्याविषयीची भावना जाणून घेण्यासाठी एक टास्क दिला परंतु पाकिस्तानी नागरिकांनी आश्चर्यकारक कृती केली.
Tiranga and Pakistani
Tiranga and PakistaniEsakal

भारत (India) आणि पाकिस्तानचं (Pakistan) वैर कुणापासून लपलेलं नाही. पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमेवर सातत्याने कुरापती काढत असतात. त्यामुळे तिथं नेहमीच काही ना काही घटना घडत असतात. साहजिकच याचा परिणाम सर्वसामान्यांच्या मानसिकतेवरही होत असतो. सध्या भारतात 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा केला जात असताना एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये युट्यूबर पाकिस्तानी लोकांना भारतीय ध्वज तिरंग्याबद्दल (Tricolor) काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी एक टास्क देतो आणि तो जर पुर्ण केला तर त्यासाठी मोठी रक्कम बक्षिस देणार असल्याचंही सांगतो. टास्क दिल्यानंतर पाकिस्तानी काय प्रतिक्रिया देतात. त्याचा व्हिडीओ तो करतो. (How do Pakistanis think about India's tricolor? Watch the video)

Tiranga and Pakistani
राजपथावर अवतरली महाराष्ट्रातील जैवविविधता! चित्ररथाची खास झलक

व्हायरल व्हिडीओमध्ये एक युट्यूबर पाकिस्तानमधील विविध ठिकाणी जाऊन लोकांना भेटतो. आपल्याकडे असलेला पैशांचा बंडल दाखवत तो म्हणतो की , “मी तुम्हाला एक टास्क देणार आहे. तो टास्क तुम्ही पुर्ण केला तर ही रक्कम तुम्हाला बक्षिस म्हणून दिली जाईल.” त्याच्या हातातील पैशाचा बंडल पाहून सगळेच टास्कसाठी तयार होतात. परंतु यानंतर जे होतं ते सर्वांना अचंबित करणारे आहे. तो प्रत्येकाला आधी लायटर देतो आणि त्यानंतर त्यांच्या हातात भारताचा ध्वज देतो आणि तो जाळायला सांगतो.

त्यानं असे सांगितल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांच्या प्रतिक्रिया आश्चर्यचकीत करणाऱ्या आहेत. कदाचित आपल्याला असं वाटू शकेल की भारत पाकिस्तानमध्ये द्वेषाचं वातावरण असताना पाकिस्तानी लोक सहज भारतीय ध्वज जाळू शकतील. परंतु पाकिस्तानी लोकांनी चक्क ध्वज जाळायला नकार दिला. ते युट्यूबरला म्हणतात की, आम्ही हे काम नाही करु शकत. ते आपले शेजारी आहेत. आपल्यात वाद असला म्हणून त्यांचा झेंडा असं जाळणे योग्य नाही. काहीजण तर त्याही पुढे जाऊन म्हटले की आपला पाकिस्तानी ध्वज जर कुणी जाळला तर आपल्याला कसे वाटेल.

Tiranga and Pakistani
अवघा राजपथ महाराष्ट्रमय! प्रजासत्ताकदिनी चित्ररथातून जैवविविधतेचे दर्शन

त्यावर युट्यूबर म्हणतो, त्याला काय होतंय जाळायला. तुम्हाला कोण बघणार आहे येथे. आणि त्याबदल्यात तुम्हाला बक्षिस म्हणून एवढी रक्कम पण मिळणार आहे. परंतु तरीही लोक तयार होत नाहीत. त्यानंतर तो बक्षिस रक्कम दुप्पट, तिप्पट, चौपट करतो तरीही लोक तयार होत नाहीत. ते प्रत्येकजण या मतावर ठाम राहतात की, ध्वज कोणत्याही देशाचा असला तरी तो ध्वज आहे. त्याच्याशी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही हा ध्वज कदापि जाळणार नाही. खरंतर युट्युबरला सुद्धा हेच अपेक्षित असते. तोही त्यांच्या उत्तरांनी खुश होतो.

यादरम्यान एक मुलगा मात्र बक्षिस म्हणून तिरंगा जाळण्यासाठी तयार होतो. मात्र युट्युबर त्याला तसं करू देत नाही आणि त्याच्या हातातून तो ध्वज ओढून घेतो. त्यावर तो मुलगा म्हणतो की मी हे फक्त टास्कचा भाग म्हणून करायला तयार झालो नाहीतर मी तसं कदापि केलं नसते. युट्युबर त्याला समजावून ध्वजाचं महत्त्व समजावून सांगतो.

परंतु एकंदरीतच 99 टक्के पाकिस्तानी लोक कितीही पैसे दिले तरी भारतीय झेंडा जाळण्यास तयार नसल्याचे या व्हिडीओवरून दिसून येते. जे खऱ्या अर्थाने पाकिस्तानी सर्वसामान्य लोकांची मानसिकता दर्शवते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com