2014 नंतरच्या नव्या नोकऱ्यांची माहिती द्या : पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 मे 2018

केंद्र सरकारने मागील चार वर्षांमध्ये किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, याची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबतची माहिती संबंधित मंत्रालयाकडे मागितली आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही माहिती महत्वपूर्ण असणार आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मागील चार वर्षांमध्ये किती नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, याची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबतची माहिती संबंधित मंत्रालयाकडे मागितली आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ही माहिती महत्वपूर्ण असणार आहे. 

employee call center india

पंतप्रधान मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील बेरोजगार तरूणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मोदी सरकारच्या चार वर्षांमध्ये किती नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात आल्या याबाबतची माहिती पंतप्रधान मोदींनी मंत्रालयाकडे मागितली आहे. मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीच्या रिपोर्टकार्डमध्ये देशातील किती बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्या. या माहितीचा फायदा भाजपला आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी होणार आहे. 

Web Title: How many jobs created by Modi government say PM Modi