किती जीव घेणार आहात मोदी बाबू?- ममता बॅनर्जी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

कोलकता- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर घातलेल्या बंदीनंतर देशात 90 जणांना जीव गमवावा लागला आहे. अजून किती जीव घेणार आहात मोदी बाबू? असा प्रश्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवरून आज (गुरुवार) उपस्थित केला आहे.

बॅनर्जी म्हणाल्या, 'पंतप्रधानांनी काळा पैशावर घाला घालण्यासाठी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातली आहे. पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे. देशभरातील नागरिक पैसे मिळविण्यासाठी बॅंक व एटीएमच्या रांगेत उभे राहत आहेत. अनेकांना याचा त्रास होताना दिसत असून, देशभरात 90 जणांना जीव गमवावा लागला आहे. अजूनही किती जीव घेणार आहात मोदी बाबू?'

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांवरील बंदीनंतर पंतप्रधानांवर जोरदार टीका केली आहे. शिवाय, महिनाभरात दिल्ली, लखनौ, पाटणा येथे धरणे आंदोलनही केले आहे.

Web Title: How many more Modi babu?: Mamta