जम्मू काश्मीरमध्ये आतापर्यंत कितीवेळा राज्यपाल राजवट झाली लागू ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 जून 2018

भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज (मंगळवार) जम्मू काश्मीरमधील मुफ्ती सरकारच्या सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधली परिस्थिती लक्षात घेता तिथे राज्यपाल राजवट लागू करायला हवी, अशी मागणी भाजपाने केली आहे. यापूर्वीही अनेकवेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 7 वेळा येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे.

1) मार्च 1977 - पहिल्यांदा येथे मार्च 1977 मध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी नॅशनल कॉन्फ्रंसचे नेते शेख अब्दुल्ला यांनी कांग्रेससोबतची आघाडी तोडली होती, त्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी 105 दिवसांचा कार्यकाळ या राजवटीचा राहिला होता.
2) मार्च 1986 - दूसऱ्या वेळी 1986 साली राज्यपाल राजवट लागू झाली. यावेळी सरकारने विधानसभेत बहुमत गमावले होते. यावेळी 246 दिवसांचा कार्यकाळ राज्यपाल राजवटीचा राहिला होता.
3) जानेवारी 1990 - यावेळी संविधानिक अडचणीमुळे विधानसभा भंग करण्यात आली होती. हा कार्यकाळ खुप मोठा होता. यावेळी तब्बल 6 वर्षे 264 दिवसांसाठी राज्यपाल राजवट होती. 
4) ऑक्टोबर 2002 - यावेळी केवळ 15 दिवसांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.
5) जुलै 2008 - यावेळी 178 दिवसांसाठी राज्यपाल राजवट होती. कांग्रेस आणि पीडीपी मधील युती तुटल्याने राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. यावेळी कांग्रेसचे गुलाम नबी आजाद मुख्यमंत्री होते. 
6) जानेवारी 2015 - निवडणुकांच्या निकालानंतर कोणीच सरकार स्थापन न करु शकल्याने यावेळी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती. हा कार्यकाळ 51 दिवसांचा होता.
7) जानेवारी 2016 - तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मृ्त्यूमुळे 87 दिवसांसाठी राज्यपाल राजवट लागू करण्यात आली होती.

Web Title: How many times have the governor ruled in jammu and Kashmir?