व्हॉट्सअॅपवर डिलिट केलेला मेसेजही येणार पाहता

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

व्हॉट्सअॅपवर एखाद्याने आपल्याला पाठविलेला आणि डिलिट केलेला मेसेज आपण अगदी सहजपणे वाचू शकणार आहोत. यासाठी आपल्याला नोटिफिकेशन हिस्टरी (Notification Histrory) हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकते.

नवी दिल्ली : एखाद्या व्यक्तीने आपल्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठविलेला असेल आणि तो मेसेज पाठविणाऱ्याने डिलिट केला असेल तर तो डिलिट केलेला मेसेज आता आपल्याला पाहता येणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅपशी संबंधित नवे अॅप लाँच करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून डिलिट केलेला मेसेज वाचता येणार आहे. 

whatsApp

व्हॉट्सअॅपवर एखाद्याने आपल्याला पाठविलेला आणि डिलिट केलेला मेसेज आपण अगदी सहजपणे वाचू शकणार आहोत. यासाठी आपल्याला नोटिफिकेशन हिस्टरी (Notification Histrory) हे अॅप डाउनलोड करावे लागणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकते.

- नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification Histrory) अॅप असे करा अॅक्सेस :

- अॅप ओपन करा आणि त्यातील नोटिफिकेशन आणि अॅडमिनिस्ट्रेटर अॅक्सेस सुरू करा. 

- त्यानंतर हे अॅप तुमची नोटिफिकेशन हिस्ट्री रेकॉर्ड करायला सुरू करेल. त्यानंतर हे अॅप ओपन करा आणि व्हॉट्सअॅप आयकॉनवर क्लिक करा. 

- हे सर्व केल्यानंतर पुढे तुम्हाला पाठविलेला मेसेज ज्याने डिलिट केला, त्याचा कॉन्टॅक्ट सर्च करा. त्यानंतर अगदी सहजपणे डिलिट केलाला मेसेज पाहता येऊ शकतो. 

Web Title: this is how you can read deleted messages on whatsapp