जावडेकरांनी राजीनामा द्यावा ; खासगी शाळांच्या प्रतिनिधींची मागणी

वृत्तसंस्था
शनिवार, 31 मार्च 2018

बोर्डाच्या परीक्षा योग्यरीत्या घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वतंत्र शाळा आघाडीचे (निसा) अध्यक्ष कुलभूषण शर्मा यांनी केली. पेपरफुटी प्रकरणाचा विद्यार्थ्यांवर नाहक ताण येत असल्याचेही शर्मा यांनी या वेळी सांगितले. देशभरातील 60 हजार शाळांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा "निसा'चा दावा आहे. 

नवी दिल्ली : बोर्डाच्या परीक्षा योग्यरीत्या घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले असल्याने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वतंत्र शाळा आघाडीचे (निसा) अध्यक्ष कुलभूषण शर्मा यांनी केली. पेपरफुटी प्रकरणाचा विद्यार्थ्यांवर नाहक ताण येत असल्याचेही शर्मा यांनी या वेळी सांगितले. देशभरातील 60 हजार शाळांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा "निसा'चा दावा आहे. 

पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकार जबाबदारी का घेत नाही, असा सवाल करताना "सीबीएसई'ने परीक्षेविषयक आचारसंहिता कडक करण्याची गरज असल्याचे शर्मा म्हणाले. राजकीय दबावामुळे सीबीएसई त्यांच्या मूळ कर्तव्यापासून परावृत्त होत आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियंत्रणात "सीबीएसई' नियामकाचे काम करत आहे. यामध्ये सरकारचे अपयश स्पष्ट दिसत असून, मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शर्मा यांनी केली. 

"निसा'च्या म्हणण्यानुसार सीबीएसईही पूर्णपणे स्वतंत्र व स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे शिक्षणाचे नियमन, वित्तपुरवठा व मूल्यांकनही स्वतंत्र व स्वायत्तपणे व्हायला हवे. जोपर्यंत मंत्रालयाकडून या तीन बाबी होतील, तोपर्यंत असे गैरप्रकार होत राहतील, असे "निसा'चे राष्ट्रीय समन्वयक अमित चंद्रा म्हणाले. 

Web Title: HRD Minister Prakash Jawdekar should be Resign their Post Demanded by private school