जमावाकडून हत्येप्रकरणी 'यूपी' सरकारला नोटीस 

पीटीआय
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

लखनौ : उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात पोलिसांच्या वाहनातून खाली खेचत एका व्यक्तीची जमावाने हत्या केल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश सरकारला नोटिस पाठविली आहे. 

उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना आयोगाने नोटीस पाठविली असून, जमावाकडून हत्या झाल्याच्या या प्रकरणाची सविस्तर माहिती चार आठवड्यांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. 

अटक करण्यात आलेल्या राजेंद्र ऊर्फ मनू (वय 28) याला पोलिसांच्या वाहनातून खाली खेचून घेत जमावाने त्याची हत्या केली. या वेळी पोलिस उपस्थित असूनही त्यांनी राजेंद्र याचे संरक्षण केले नाही. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आयोगाने स्वतःहून दखल घेत राज्य सरकारला नोटिस पाठविली आहे.

''अटक करण्यात आलेल्या व्यक्तीच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी पोलिसांची असते. राजेंद्रचे जमावापासून संरक्षण करण्यात पोलिस कमी पडले,'' असे आयोगाने नोटिशीत म्हटले आहे. 

Web Title: Human rights commission issues notice to UP government over mob lynching