भारतीय 'कोवॅक्सिन'चे मानवी परिक्षण सुरु; नाकाद्वारे दिली जाणार लस

कार्तिक पुजारी
गुरुवार, 16 जुलै 2020

हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनी कोरोनाग्रस्तांना नाकाद्वारे दिली जाणारी लस तयार करत आहे. या लसीला कोवॅक्सीन असं नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्ली- जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात जगभरातील वैज्ञानिक कोरोना विषाणूवर प्रभावी लस शोधण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. भारतीय वैज्ञानिकही लस निर्मितीच्या कार्यात गुंतले आहेत. हैदराबाद स्थित भारत बायोटेक कंपनी कोरोनाग्रस्तांना नाकाद्वारे दिली जाणारी लस तयार करत आहे. या लसीला कोवॅक्सीन असं नाव देण्यात आले आहे. या लसीच्या मानवी चाचणीला सरकारकडून परवानगी मिळाली आहे. 

जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाउन, सकाळी सात वाजेपर्यंत कडकडीत बंद
कोरोना विषाणू नाक आणि तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करतो. नाकाद्वारे म्यूकस मेंमरेनच्या माध्यमातून कोरोना विषाणू शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे तोंड, नाक आणि पचनक्रिया प्रभावीत होतात. नाकाद्वारे लस दिल्यास कोरोना विषाणू फुफ्फुसापर्यंत पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतो. त्यामुळे नाकाद्वारे लस देण्याचा निर्णय कंपनीतर्फे घेण्यात आला आहे. यूनिवर्सिटी ऑफ विस्कांसिन मेडीसन आणि वॅक्सीन निर्माता कंपनी फ्लूजेन वायरोलॉजिस्टने भारत बायोटेकसोबत मिळून कोरोना विषाणूची लस विकसित करत आहेत.

कंपनी मानवी चाचणीचे परिक्षण सुरु करत आहे. लसीचे परिक्षण तीन टप्प्यात घेतले जाते. हे तीन टप्पे पूर्ण होऊल लस हाती येण्यास कमीतकमी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. लस तयार झाल्यानंतर कोवॅक्सिनचा एक थेंब कोरोनाबाधित रुग्णांच्या नाकामध्ये टाकण्यात येणार आहे. कोवॅक्सिन मानवी चाचणीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार या वर्षाच्या शेवटपर्यंत ही लस मानवी चाचणीसाठी तयार होईल. परिक्षण यशस्वी ठरल्यास कंपनी 20 कोटी डोस बनवणार आहे.

भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; रुग्णसंख्या पोहोचली...
आतापर्यंत कोणतीही प्रभावी लस कोरोनाविरोधात लढण्यासाठी तयार झालेली नाही. काही लस पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. जगभरात 120 पेक्षा अधिक लसींवर परिक्षण सुरु आहे. रशियाने लसीचा पहिला टप्पा पार केल्याचा दावा काही दिवसांपूर्वी केला होता. अमेरिकेतही लस निर्मितीचे कार्य युद्ध पातळीवर सुरु असून कंपनी दुसऱ्या टप्प्यातील परिक्षण सुरु करण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकेतून लस संबंधी एक-दोन दिवसात मोठी बातमी येण्याची शक्यता आहे. असे असली तरी लस सर्वांपर्यत उपलब्ध होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Human testing of Indian covacin begins will be given through the nose