'त्या' जवानाला ठरवले मनोरुग्ण; पत्नीचे उपोषण

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

रेवा (मध्य प्रदेश)- 'लष्करातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असून, त्यांचे शूज पॉलिश करून घेतात. याबाबत व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केल्यानंतर लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांना लष्कराने त्यांना मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पतीला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पत्नीने उपोषणाला सुरवात केली आहे.

रेवा (मध्य प्रदेश)- 'लष्करातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असून, त्यांचे शूज पॉलिश करून घेतात. याबाबत व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केल्यानंतर लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांना लष्कराने त्यांना मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पतीला न्याय मिळावा म्हणून त्यांच्या पत्नीने उपोषणाला सुरवात केली आहे.

योग्य प्रतापसिंग यांची फताहगड येथे नियुक्ती असलेल्या ठिकाणी त्यांची पत्नी रिचा सिंग यांनी उपोषणाला सुरवात केली आहे. उपोषणाचा आज (सोमवार) तिसरा दिवस आहे. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती ढासळल्याने उपचारासाठी त्यांना संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योग्य प्रतापसिंग यांना लखनौ येथील मनोरुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

'वरिष्ठ अधिकारी माझ्या पतीला त्रास देतात. बूट पॉलिश करण्याबरोबरच घरामधील वेगवेगळे कामे करण्यास भाग पाडत होते. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी सोशल नेटवर्किंगवर अपलोड केल्यानंतर त्यांना मनोरुग्ण ठरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्हाला कोणीही मदत करत नाही. परंतु, न्याय मिळण्यासाठी माझे पती, मुलगा व मी लढा देणार आहोत,' असे रिचा सिंग यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्‍मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफचा जवान तेजबहादूर यादव यांच्या व्हिडिओनंतर अपलोड केल्यानंतर 'देशातील सरकारी शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना आमच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. सगळे सण उत्सव ते कुटूंबासोबत साजरे करतात, परंतु आम्हाला कुटुंबापासुन दूर राहुनही सोयी सुविधांसाठी झगडावे लागत आहे,' अशी व्यथा मांडणारा केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान (सीआरपीएफ) जत सिंह व्हिडिओ अपलोड केला होता. तिसऱया दिवशी लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी तक्रारीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. यामुळे सलग तिन दिवस लष्करातील तक्रारी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जनतेसमोर येऊ लागल्या आहेत. देशातील नागरिकही जवानांच्या पाठीमागे उभे राहिल्याने वरिष्ठ स्तरावरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, लान्स नायक योग्य प्रतापसिंग यांनी म्हटले होते की, 'लष्करातील वरिष्ठ अधिकारी त्रास देत असून, त्यांचे शूज पॉलिश करून घेतात. याबाबत व्हिडिओ तयार करून सोशल नेटवर्किंगवर अपलोड केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहून याबाबत कळविले होते. पंतप्रधान कार्यालयाने चौकशीबाबत उत्तरही दिले होते. चौकशीला सुरवात झाल्यानंतर माझ्या त्रासामध्ये वाढ झाली. मला होत असलेल्या त्रासाबाबत कळविले, यामध्ये माझी काय चूक आहे. मला त्रास दिला तरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारणार नाही. अथवा कोणा अधिकाऱयाचे नाव घेणार नाही. परंतु, सेवानिवृत्त होताना याबाबत खुलासा करेल.'

Web Title: Hunger Strike of Wife of Army Jawan