भुकेल्यांची संख्या भारतात अधिक

Hungry
Hungry

नवी दिल्ली - भारताची अर्थव्यवस्था अडचणीत असल्याची चर्चा सुरू असताना आणखी एका अहवालामुळे देशाच्या चिंतेत भर पडली आहे. जागतिक भूक निर्देशांक-२०१९ मधील (ग्लोबल हंगर इंडेक्‍स- जीएचआय) ११७ देशांमध्ये भारताचे स्थान १०२ वर आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ या शेजारील देशांपेक्षा भारताची कामगिरी खराब असल्याचे या निर्देशांकातून दिसून येते. गेल्या वर्षी भारताचा क्रमांक १०३ होता.

जागतिक भूक निर्देशांकाच्या संकेतस्थळावरून भूक आणि कुपोषणाचा जगभरातून आढावा घेतला जातो. आयर्लंडची ‘कर्न्सन वर्ल्डवाईड’ आणि जर्मनीतील ‘वेल्ट हंगर हिल्फ’ या संस्था संयुक्तपणे हा अहवाल तयार करतात. यंदाचा अहवाल बुधवारी जाहीर करण्यात आला. भारतातील भूकेची समस्या गंभीर असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे.

‘जीएचआय’मध्ये यंदा पाचपेक्षा कमी गुणांसह बेलारूस, युक्रेन, क्‍युबा आणि कुवेत हे देश अग्रस्थानी असल्याचे नमूद केले आहे. 

‘जीएचआय’चे गुणांकन चार घटकांवर आधारित असते. यात कुपोषण, कमी वजनाची मुले, कमी वजन असलेली पाच वर्षांखालील मुलांची संख्या आणि खुरट्या वाढीची मुले, वजनाच्या तुलनेत कमी उंची असलेली पाच वर्षांखालील मुले व त्यातून निर्माण होणारे गंभीर कुपोषण, बालमृत्यू आणि पाच वर्षांखालील मुलांमधील मृत्यूचे प्रमाण यांचा विचार केला जातो. कमी वजनाच्या मुलांची संख्या भारतात २००८ ते २०१२मध्ये १६.६ टक्के होती, त्यात २०१४-१८मध्ये २०.८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. ६ ते २३ महिन्यांच्या बाळांपैकी केवळ ९.६ टक्के बाळांनाच किमान स्वाकार्ह आहार मिळत असल्याचे अहवालात 

म्हटले आहे. मुलांमधील कुपोषणाची स्थिती भारतात अन्य देशांपेक्षा भयानक आहे. येमेन आणि दिबोटी यांसारख्या सतत युद्धाच्या छायेत आणि तीव्र हवामानाच्या देशांनी यामध्ये चांगली कामगिरी केली आहे. नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेशची स्थिती भारतापेक्षाही सरस ठरली आहे.

आशियातील अन्य देशांचा क्रमांक
२५ चीन 
६६ श्रीलंका
६९ म्यानमार
७३ नेपाळ
८८ बांगलादेश
९४ पाकिस्तान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com