हुर्रियत नेते गिलानी रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

हुर्रियतच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलानी यांच्या ईसीजीसह काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. गिलानी यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी.

श्रीनगर - हुर्रियत कॉन्फरन्स या फुटीरतावादी संघटनेचे नेते सईद अली शाह गिलानी यांना बुधवारी रात्री छातीत वेदना होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलानी यांना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास छातीत वेदना होऊ लागल्या. त्यानंतर त्यांना शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआयएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले. गिलानी हे नजरकैदेत होते. त्यांना पोलिस बंदोबस्तात रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु आहेत.

हुर्रियतच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गिलानी यांच्या ईसीजीसह काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. गिलानी यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी.

Web Title: Hurriyat leader Syed Ali Shah Geelani admitted to ICU under police watch