मी कामाला अन् पत्नी प्रियकरासोबत; काय करू...

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

मी, कामाला गेलो की ती त्याच्याबरोबर फिरत असे. काय करू सांगा...

पाटणाः एकाच्या पत्नीचे गावामध्ये प्रेमससंबंध होते. पत्नीच्या प्रेमाबद्दल पतीला संशय आला होता. दोघांना पकडण्यासाठी त्याने नियोजन केले अन् तिघे एकमेकांसमोर आले आणि भर रस्त्यात जोरदार हाणामारी झाली.

पोलिस अधिकारी आरती जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांमध्ये भर रस्त्यात जोरदार मारामारी सुरू असल्याची माहिती मिळाली. तिघांना पोलिस चौकीमध्ये आणल्यानंतर प्रेमप्रकरणातून हाणामारी सुरू असल्याचे समजले. पत्नीला समजावण्यात आले असून, तिच्या वडीलांनीही आपल्या मुलीची चूक असल्याचे मान्य केले आहे.

पती नोकरीसाठी बाहेर पडल्यानंतर पत्नी प्रियकरासोबत फिरत असे. पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल पतीला संशय आला होता. पत्नी व तिच्या प्रियकराला पकडण्याचे पतीने ठरवले. रविवारी (ता. 8) पत्नी प्रियकराच्या दुचाकीवर बसून बिहारकडे निघाली होती. पतीने रस्त्यावर दुचाकी अडवली. यानंतर तिघांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. अर्धा तास ही हाणामारी सुरू होती. यानंतर तिघांना चौकीत आणण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

पती म्हणाला, 'पत्नीच्या प्रेमाबद्दल मला अनेक दिवसांपासून माहिती होती. तिला अनेकदा समजावण्यात आले. परंतु, ती ऐकत नव्हती. मी, कामाला गेलो की ती त्याच्याबरोबर फिरत असे. काय करू सांगा...'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband caught wife with boyfriend at bihar