पती आणि मुलीनेच वृद्ध महिलेला अन्नपाण्याविना तीन दिवस कोंडले

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जानेवारी 2017

इडुक्की (केरळ) : एका वृद्ध महिलेला तिच्या पतीने आणि मुलीने तीन दिवस जेवणाची किंवा पाण्याची काहीही व्यवस्था न करता घरात कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

केरळमधील इडुक्की जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका घरात एका वृद्ध महिलेला तीन दिवस अन्न पाण्याशिवाय ठेवण्यात आले होते. ज्यावेळी पोलिस संबंधित घरात पोचले त्यावेळी जमिनीवर वृद्ध महिला बेशुद्धावस्थेत पडलेली आढळून आली. पोलिसांनी आरोग्य विभागामार्फत वृद्धेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी मारायूरी पोलिसांनी पालकांच्या देखभालीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे पालक देखभाल कायदा?
समाजकल्याण मंत्रालयाचा हा कायदा 2007 साली आलेला पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा आहे. या कायद्यानुसार पाल्यांनी त्यांच्या पालकांचा वृद्धपणी सांभाळ करणे बंधनकारक आहे. जर ते पालकांचा सांभाळ करू शकत नसतील तर पालक या कायद्यांतर्गत न्याय मागू शकतात.

Web Title: Husband, daughter locks woman at home for three days in Kerala