पत्नीच्या जाण्यानंतरही पतीने केले 'असं' स्वप्न पूर्ण...

वृत्तसंस्था
Tuesday, 11 August 2020

एका अपघातादरम्यान पत्नी जग सोडून गेली. पण, पत्नीचे स्वप्न पतीने नुकतेच पूर्ण केले असून, दोघांचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून पतीचे कौतुक करत आहेत.

बंगळुरू: एका अपघातादरम्यान पत्नी जग सोडून गेली. पण, पत्नीचे स्वप्न पतीने नुकतेच पूर्ण केले असून, दोघांचे छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून पतीचे कौतुक करत आहेत.

कर्नाटकचे उद्योगपती श्रीनिवास गुप्ता हे तीन वर्षांपूर्वी कुटुंबियांसह तिरुपतीला जात होते. प्रवासादरम्यान त्यांच्या मोटारीला अपघात झाला आणि पत्नी माधवी यांचा जागीच मृत्यू झाला. माधवी यांचे स्वप्न होते की, आपला एक बंगला असावा. श्रीनिवास यांनी तीन वर्षांनी आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण केले. एवढेच नाही तर कुटुंब पूर्ण करण्यासाठी त्यांनी पत्नीचा मेणाचा पुतळाही तयार केला आहे. श्रीनिवास गुप्ता यांनी नुकताच बंगल्यात गृहप्रवेश केला. गृहप्रवेशावेळी सोबत पत्नीही होती. पण, मेणाच्या पुतळ्याच्या स्वरूपात. श्रीनिवास यांनी पत्नी शेजारी बसून छायाचित्रे काढली. संबंधित छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. शिवाय, कलाकाराच्या कलेचेही कौतुक होत आहे. कारण, मेणाचा पुतळा अनेकांना हुबेहुब वाटत आहे.

श्रीनिवास म्हणाले, 'माझ्या पत्नीला घरात पाहून मला आनंद झाला आहे. कलाकार श्रीधर मूर्ती यांना माझ्या पत्नीचा पुतळा बनवण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला. पुतळ्याच्या माध्यमातून आम्ही कुटुंबिय पुन्हा एकत्र आलो आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: husband fulfills late wifes dream of owning a bungalow by installing her lifesize wax tatue at karnataka