प्रेमात अडथळा ठरणाऱया पत्नीला 'असे' केले दूर...

husband killed wife poisons injection love affair at bengaluru
husband killed wife poisons injection love affair at bengaluru

बंगळूरू: दोघांचा वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, त्याचे बाहेर एकीसोबत प्रेमसंबंध होते. आपल्या प्रेमसंबंधाबाबत पत्नीला समजल्यामुळे त्याने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले. पत्नी झोपेत असतानाच तिला विषारी इंजेक्शन देऊन मारल्याची घटना येथे घडली आहे.

पत्नीचा खून केल्याप्रकरणी 30 वर्षीय युवकाला अटक केली आहे. व्यंकटेश असे त्याचे नाव असून, तो जिल्हा सरकारी रुग्णालयात काम करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेश व दीपा यांचा 23 मार्च 2019 रोजी विवाह झाला होता. विवाह झाल्यानंतर व्यंकटेशचे बाहेर एका युवतीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. याबद्दल तिने पतीला विचारले. यामुळे तो चिडला होता. दोघांमध्ये अनेकदा भांडणेही होत होती. कुटुंबियांनीही त्याला समजावून सांगितले होते. पण, तो ऐकायला तयार नव्हता. दीपा आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे त्याने पत्नीचा काटा काढण्याचे ठरवले. रुग्णालयात कामाला असल्यामुळे त्याला इंजेक्शनची माहिती होती. घरी येताना त्याने विषारी इंजेक्शन आणले होते. पत्नी गाढ झोपेत असताना त्याने पत्नीला इंजेक्शन दिले. नातेवाईकांनी उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी दीपाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, व्यंकटेशला ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com