अनैतिक संबंधातून पत्नीचा शिरच्छेद

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली- प्रेमाचे प्रतीक असलेल्या "व्हॅलेंटाइन डे'ला म्हणजेच मंगळवारी (ता. 14) पूर्व दिल्लीतील मधुनगरमध्ये राहणाऱ्या सुबोध (वय 40) याने पत्नीची हत्या केल्याचे उघडकीस आले. एवढेच नाही तर तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे त्याने केले होते. पोलिसांना त्याला बुधवारी अटक केली.

वरिष्ठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुबोध हा प्लंबिंगची कामे करतो. पहिली पत्नी मनीषा (वय 35) हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय सुबोधला होता. तिच्याकडून खरी माहिती काढून घेण्यासाठी त्याने 10 व 11 फेब्रुवारीच्या रात्री तिला मारहाण केली होती. त्यानंतर अत्यंत निर्दयपणे त्याने करवतीने मनीषाचा शिरच्छेद केला. तिचे शीर पलंगाच्या कप्प्यात ठेवले. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचे तुकडे करण्याचे त्याचे नियोजन होते; पण त्याआधीत सुबोधला आज अटक झाली. विशेष म्हणजे दुसरी पत्नी मुनिया व तीन मुलांसमोर मनीषाचा शिरच्छेद केला, अशी कबुली सुबोधने दिली.

Web Title: husband murder wife on valentine day

टॅग्स