
Crime News : पुन्हा एक श्रद्धा वालकर! पण इथे पतीनेच केला घात; तुकडे करून पाण्याच्या टाकीत फेकले
छत्तीसगढच्या बिलासपूर इथं एक श्रध्दा मर्डर केससारखीच घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपी पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून पाण्याच्या टाकीमध्ये टाकून दिले आहेत.
आरोपी पतीचं नाव पवन ठाकूर असं असून त्याच्या मृत पत्नीचं नाव सती साहू आहे. पवनने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका घेतली होती. म्हणूनच त्याने सतीची हत्या केली. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांना शंका आहे की ही हत्या जवळपास १ ते २ महिने आधी झाली आहे. पोलिसांनी आरोपी पवनला ताब्यात घेतलं आहे.
तसंच पोलिसांनी मृत सती साहूचा मृतदेहही ताब्यात घेतला आहे. पवनने सतीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि आपल्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये हे तुकडे टाकले.
छत्तीसगढची ही घटना दिल्लीतल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखीच आहे. या प्रकरणामध्ये आरोपी आफताबने आपली लिव्ह इन पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे त्याने जंगलात तसंच वेगवेगळ्या भागामध्ये टाकले होते.