पती नागुपरात पत्नी अमेरिकेत अन् व्हॉट्सअॅपवर झाला घटस्फोट

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 जानेवारी 2019

व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित पती नागपुरात तर पत्नी अमेरिकेत असून, व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलवरून घटस्फोट झाला. 

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवरून अनेकदा चॅटिंग केले जाते. मात्र, आता चक्क व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये संबंधित पती नागपुरात तर पत्नी अमेरिकेत असून, व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलवरून घटस्फोट झाला. 

घटस्फोट होताना पती-पत्नीची न्यायालयात उपस्थिती असणे बंधनकारक असते. त्यानंतरच घटस्फोटाच्या पुढील बाबी पूर्ण होतात. मात्र, आता घटस्फोटाबाबत दुर्मिळ अशी घटना नागपुरात घडली. अमेरिकेतील मिशिगन येथे 35 वर्षीय महिला शिक्षणासाठी 'स्टुडंट व्हिसा'वर राहत आहे. संबंधित महिला ज्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत होती, त्या शिक्षणसंस्थेकडून तिला सुट्टी दिली जात नव्हती. त्यामुळे या महिलेने घटस्फोटाची सुनावणी व्हॉट्सअॅपच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्हावी, अशी विनंती न्यायालयाला केली. या महिलेचा 37 वर्षीय पती नागपुरातील खामला येथील रहिवासी असून, तोही मिशिगन येथे नोकरीस आहे. मात्र, जेव्हा हा घटस्फोटाला मान्यता मिळाली. तेव्हा तो आपल्या नागपुरातील घरात होता. 

दरम्यान, दोन्ही बाजूंची विनंती ऐकल्यानंतर नागपूर कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्वाती चौहान यांनी त्यांना विभक्त होण्यासाठी परवानगी दिली. या सुनावणीदरम्यान पोटगीपोटी 10 लाख रुपयेही देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अखेर 14 जानेवारीला त्यांचा घटस्फोट झाला.

Web Title: Husband in Nagpur wife in US court grants divorce via WhatsApp