supreme court
supreme court

सासरी पत्नीला झालेल्या प्रत्येक दुखापतीसाठी पती जबाबदार- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने आपल्या पत्नीला मारहाण करणाऱ्या एका व्यक्तीची जामीन देण्याच्या विनंतीची याचिका फेटाळून लावली आहे. सासरमध्ये पत्नीला होणाऱ्या मारहाणीसाठी पतीच जबाबदार आहे, असं कारण सुप्रीम कोर्टाने यामागे दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, पत्नीला दुखापत कुटुंबातील इतर सदस्याकडून झाली असली तरी त्यासाठी पतीला जबाबदार धरलं जावं. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे हे तिसरे लग्न आहे, तर महिलेचे दुसरे लग्न आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या एका वर्षानंतर 2018 मध्ये दोघांनी एका बाळाला जन्म दिला. मागील वर्षी जून महिन्यात महिलेने लुधियाना पोलिस स्टेशनमध्ये पती आणि आपल्या सासरच्या विरोधात तक्रार दाखल केली. महिलेने आरोप केला होता की, हुंड्याची मागणी पूर्ण करु न शकल्याने पती, सासु आणि सासरे मारहाण करत आहेत. छळ करत आहेत.

पतीची बाजू मांडणारे वकील कुशाग्र महाजन यांनी आरोपीला अंतरिम जामीन देण्याची मागणी केली होती. यावर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एसए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील बँचने म्हटलं की, तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात? महिलेने आरोप केलाय की पती तिला गळा दाबून मारणार होता. तिचा आरोप आहे की तिचा गर्भपात झाला आहे. तुम्ही कशा पद्धतीचे व्यक्ती आहात, आपल्या पत्नीला क्रिकेट बॅटने मारता?

वकीलाने जेव्हा म्हटलं की महिलेने स्वत: आरोप केलाय की, तिचे सासरे तिला मुलाच्या हातून मारहाण करतात. यावर सीजेआय यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटलं की, यामुळे काहीही फरक पडत नाही की त्याचे वडील मुलाच्या हातून मारहाण करतात. सासरमध्ये जेव्हा एका महिलेला दुखापत किंवा इजा होते, तेव्हा त्याची प्राथमिक जबाबदारी पतीची असते. असं म्हणत कोर्टाने व्यक्तीची जामीनाची याचिका फेटाळून लावली आहे. याआधी पंजाब आणि हरियाणा हायकोर्टानेही पतीला अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com