'म्हणून' नवरा म्हणाला दुसऱयाशी संबंध ठेव!

husbund uploaded my nude videos for not funding his impotency wife allegation at bengaluru
husbund uploaded my nude videos for not funding his impotency wife allegation at bengaluru

बंगळूरूः वडिलांनी लाखो रुपये खर्च करून मोठ्या धामधुमीत विवाह लावून दिला. सर्वजण खूष होते. पण, विवाहाच्या पहिल्या रात्रीच नवरा नपुंसक असल्याचे समजले अन् धक्का बसला. नवऱयाने आपली बाजू लपवण्यासाठी दुसऱया पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले. सर्व गोष्टींना विरोध केल्यानंतर मला झोपेच्या गोळ्या देऊन विवस्त्र अवस्थेत छायाचित्रे काढून सोशल मीडियावर व्हायरल केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार झाली आहे.

पीडित महिला बंगळूरु येथील रहिवासी असून, तिने शनिवारी (ता. 9) पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आरोपींनी अपलोड केलेले फोटो व व्हिडिओ काढून टाकण्यासाठी पोलिसांनी सायबर क्राईम सेलच्या तज्ञांशी संपर्क साधला आहे. आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एका 26 वर्षीय विवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या दोन पानी पत्रामध्ये म्हटले आहे की, 'शहरातील महागड्या हॉटेलमध्ये 2017 मध्ये माझा विवाह झाला. विवाहासाठी वडिलांनी तब्बल 30 लाखांपेक्षा जास्त खर्च केला. मोठ्या उत्साहात विवाह सोहळा पार पडला. मात्र, विवाहाच्या पहिल्या रात्रीच नवरा नपुंसक असल्याचे समजले अन् धक्का बसला. त्याच्या घरच्यांनी हे लपवून माझे आयुष्य उद्धवस्त केले. विवाहानंतरचा प्रत्येक दिवस मला मानसिक छळ सहन करावा लागला. नवऱ्याने आपल्याला दुसऱ्या पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचा आग्रह धरला. शिवाय, नवऱ्याला नपुंसकतेच्या शस्त्रक्रियेसाठी 25 लाख रुपये देण्यासाठी त्याच्या घरचे मला त्रास देत होते. मला जेवणातून झोपेच्या गोळया देण्यात आल्या. मी झोपेत असताना मला विवस्त्र करुन माझी छायाचित्रे काढली आणि सोशल मीडियावर अपलोड केली. शिवाय, सोशल मीडियावर त्यांनी आपण शरीर विक्रिय करणारी महिला असल्याचा प्रचारही केला.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com