#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. सुरुवातीपासून नेमकं कधी काय घडलं....

नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया होत आहेत. यात बहुतेक नेत्यांनी हैदराबाद पोलिसांचे कौतुक केले, तर अनेकांनी या चकमकीवर प्रश्‍न उपस्थित केले आहेत. सुरुवातीपासून नेमकं कधी काय घडलं....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

आणखी वाचा : #hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले?

27 नोव्हेंबर 2019 : पशुवैद्यक युवा डॉक्‍टर रात्री घरी जाताना तिची बंद पडलेली गाडी पाहून मदतीच्या बहाण्याने चार जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या पाशवी कृत्यानंतर त्यांनी तिचा खून करून जाळून टाकले.

28 नोव्हेंबर : संबंधिक डॉक्‍टर युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह शादनगर पुलाखाली आढळल्याने देश हादरला.

29 नोव्हेंबर : या गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान तेलंगण पोलिसांनी 20 ते 24 वर्षे वयाच्या चार जणांना अटक केली. मोहंमद अरिफ, नवीन, केशावेलू आणि सी. चेन्नकेशवुलू उर्फ शिवा अशी आरोपींची नावे होत.

29 नोव्हेंबर : न्यायालयाने आरोपींना चौदा दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठविले. आरोपींना जिवंत जाळण्याची मागणी पीडितेच्या आईने केली होती. आरोपींना कायदेशीर मदत न देण्याचा निर्णय शादनगर बार असोसिएशनने घेतला होता. हैदराबादच्या वकिलांनीही त्यांना समर्थन दिले होते.

30 नोव्हेंबर : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी याप्रकरणी खटल्याची त्वरित सुनावणी घेण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्यांनी पीडित युवतीच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

1 डिसेंबर : या घटनेची तक्रार वेळेत दाखल न करून घेतल्याप्रकरणी पोलिस निलंबित.

2 डिसेंबर : या नृशंस घटनेवर संसदेत चर्चा.

3 डिसेंबर : दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांचे दिल्लीत बेमुदत उपोषण.

3 डिसेंबर : चेरलापल्ली तुरुंगात ठेवलेल्या चार आरोपींपैकी एक चेन्नोकेशावुलूने मूत्रपिंडाच्या आजारावरील उपचारांसाठी सोडण्याची मागणी केली.

4 डिसेंबर : खटल्याच्या सुनावणीसाठी मेहबूबनगर जिल्हा न्यायालयात लवकरच एक विशेष न्यायालय स्थापण्याची घोषणा.

6 डिसेंबर (आज) : गुन्ह्यातील चारही आरोपी पोलिसांच्या चकमकीत मारले गेले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad encounter exactly what when happened