हैदराबादमध्ये 66 लाखांच्या नव्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

हैदराबाद - हैदराबादमध्ये शनिवारी रात्री प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन ठिकाणी छापा टाकून 66 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत.

प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील हिमायतनगर भागातील तेलगू अकादमी येथे छापा टाकून हे 36 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या पैशांमध्ये सर्व 2000 हजार रुपयांच्या नव्या नोटांचा समावेश आहे. या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हा सर्व काळा पैसा असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

तर दुसरी घटना टंक बुंद भागात घडली असून, होंडा सिटी कारमधून 30 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, याही 2000 रुपयांच्याच नोटा आहेत. 

Web Title: Hyderabad: I-T dept seizes Rs 66 lakh cash in new notes