पुलावरून प्रवाशांसह बस कोसळली; सर्वजण सुरक्षित

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

हैदराबादः एका कंपनीमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱयांना घेऊन निघालेली बस पुलावरून दहा फूट खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. बुधवारी (ता. 7) रात्री सव्वाच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'खासगी बसमधून 50 कर्मचाऱयांना घेऊन बस निघाली होती. भारत नगर जवळ असलेल्या पुलावर बसला अपघात झाला. यावेळी बस पुलावरून दहा फूट खाली कोसळली. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.'

बसचे चालक मोहम्मद जाफर यांनी सांगितले की, बसला अपघात झाला, बसचे मोठे नुकसान झाले. परंतु एखादी जादू घडल्याप्रमाणे अपघातानंतर कोणालाही काही झालेले नाही. ही एक कृपाच समजावी लागले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: hyderabad news bus with 50 falls off bridge all safe