ज्येष्ठ तेलुगू कवी नारायण रेड्डी यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

हैदराबाद : ज्येष्ठ तेलुगू कवी, लेखक आणि ज्ञानपीठ विजेते सी. नारायण रेड्डी (वय 85) यांचे आज निधन झाले. रेड्डी हे सीनारे या नावानेच प्रसिद्ध होते. त्यांच्या मागे चार मुली असा परिवार आहे. रेड्डी हे आधुनिक तेलुगू लेखक होते त्याचप्रमाणे ते बहुश्रुत कवी, तेलुगू चित्रपटाचे गीतकार, शिक्षणतज्ज्ञ होते.

रेड्डी यांच्या विविध कविता, चित्रपट संगीत, नाटकांची गाणी, गझल याच्यासह 80 साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. रेड्डी यांनी चित्रपटांसाठी 3500 गाणी लिहिली आहेत. त्यांची तब्येत बिघडल्याने पहाटे तीन वाजता त्यांना मनिकोंडा येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.

रेड्डी यांचा जन्म 29 जुलै 1931 मध्ये करीमनगर जिल्ह्यातील हनुलजीपेटा या दुर्गम गावात झाला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे उर्दू माध्यमातून झाले होते. तरुणपणीच्या काळात त्यांचा रोमॅंटिक तेलुगू कवींमध्ये समावेश होता. 1980 मध्ये "विश्‍वंभर' नावाने त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यांना 1977 मध्ये पद्मश्री मिळाली होती, तर 1992 मध्ये पद्मविभूषण देण्यात आले होते.

Web Title: hyderabad news c narayana reddy passess away