'आर्य वैश्‍य समाजाचे नेते शहांच्या हातातील बाहुले'

वृत्तसंस्था
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

इल्लया यांनी गेल्या महिन्यात 'सामाजिक स्मगलरु' या नावाची आर्य वैश्‍य समाजावर टीका करणारी पुस्तिका प्रसिद्ध केली होती. 

हैदराबाद : आर्य वैश्‍य समाजाचे नेते भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या हातातील बाहुले आहेत, अशी टीका दलित कार्यकर्ते कांचा इलय्या यांनी केली. आर्य वैश्‍य समाजाने देशातील सामान्य जनतेवर अन्याय केले असून, याबाबत अमित शहा यांनी हैदराबादमध्ये येऊन माझ्याशी वादविवाद करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.

इल्लया यांनी गेल्या महिन्यात "सामाजिक स्मगलरु' या नावाची आर्य वैश्‍य समाजावर टीका करणारी पुस्तिका प्रसिद्ध केली होती. या पुस्तिकेवरून तेलंगण आणि आंध्र प्रदेशात मोठा वाद निर्माण झाला असून, इलय्या यांना काही राजकारणी आणि आर्य वैश्‍य समाजाच्या नेत्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्‍याही मिळाल्या आहेत.

त्यांच्यावर गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यातून ते थोडक्‍यात बचावले होते. आपली हत्या झाल्यास तेलंगण सरकार यासाठी जबाबदार असेल, असेही इलय्या यांनी म्हटले आहे. या पुस्तिकेवर बंदी घालण्याची आर्य वैश्‍य समाजाची मागणी आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: hyderabad news dalit leader challenges amit shaha