मोदींना वाढदिनी चक्क 68 पैशांचा धनादेश भेट

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद : आंध्र प्रदेशातील रायलसीमा सागुनिती साधना समिती या स्वयंसेवी संस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट म्हणून फक्त 68 पैशांचा धनादेश पाठवला आहे. आंध्र प्रदेशातील रायलसीमा भागात असलेल्या मागासवर्गीयांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने लक्ष वेधण्यासाठी अनोखी भेट स्वयंसेवी संस्थेमार्फत पाठविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 67 वा वाढदिवस आहे. मात्र काही सदस्यांना तो 68 वा वाढदिवस वाटला, त्यामुळे तसे धनादेश तयार केले आहेत. आम्हाला रायलसीमा भागासाठी विशेष आर्थिक विकास पॅकेज देण्यासाठी आंध्र प्रदेशात पुनर्विकास कायद्यात तरतूद आहे. मात्र अपेक्षेप्रमाणे मदत अद्याप मिळालेली नाही. या भागात पायाभूत सुविधांची अद्यापही वानवा आहे.

याआधी स्थानिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनाही स्वयंसेवी संस्थेकडून पत्र लिहण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद न आल्याने थेट पंतप्रधानांना वाढदिवशी 68 पैशांचा धनादेश पाठवून लक्ष वेधण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला. यापुढेही अनोख्या पद्धतीने आंदोलने करीतच राहू, असे स्वयंसेवी संस्थांच्या सदस्यांचे म्हणणे आहे.

आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे. तसेच अनेकांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागतोय. या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. त्याचमुळे आम्ही असा धनादेश पाठवला आहे. आम्हाला रोज जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अधोरेखित करायचा आहे. त्यामुळे आम्ही शांत राहून हे आंदोलन करत आहोत. याचा परिणाम चांगला होईल, अशी अपेक्षा आम्हाला आहे.
- बी दशरथ रेड्डी, अध्यक्ष, सागुनिती साधना समिती

Web Title: hyderabad news narendra modi dd of 68 paise a day for the development