मला तुझ्यासमोर मरायला आवडेल...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

हैदराबादः मला तुझ्यासमोर मरायला आवडेल... असे म्हणत मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. 14) सकाळी विनायक नगरमध्ये घडली. अजमीर सागर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हैदराबादः मला तुझ्यासमोर मरायला आवडेल... असे म्हणत मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून त्याने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना बुधवारी (ता. 14) सकाळी विनायक नगरमध्ये घडली. अजमीर सागर (२०) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

पोलिस उप निरिक्षक पी. नागराजू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमीर हा बहिणीच्या घरी राहून आयटीआयचे शिक्षण घेत होता. गळफास घेतला त्यावेळी घरामध्ये कोणीही नव्हते. अजमीर याने बुधवारी सकाळी आपल्या मैत्रिणीसोबत व्हॉट्सऍपवरून बोलत होता. यावेळी त्याने तुझ्यासमोर मरायला आवडेल असा मजकूर पाठवला. काही वेळातच त्याने व्हॉट्सऍप कॉलिंग सुरू करून गळफास घेऊन आत्महत्या केली. संबंधित व्हिडिओ 2.04 मिनिटांचा असून तो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे अजमीरच्या मैत्रिणीला मानसिक धक्का बसला आहे.

अजमीर याचे बीएससीला असणाऱ्या एका मुलीवर प्रेम होते. परंतु, दोघांच्या प्रेमसंबंधाला कुटुंबियांचा विरोध होता. अलीकडचे अजमीरच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी वधूचा शोध सुरु केला होता. अजमीरने त्याच्या मैत्रिणीला मी तुझ्यासमोर आनंदाने मरण पत्करीन असा मजकूर पाठवला अन् काही वेळातच त्याने गळफास घेतला. सुरुवातीला तो गंमत करतोय असे वाटले पण नंतर त्याच्याकडून प्रतिसाद येणे बंद झाले. काही वेळानंतर त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. घटना घडली त्यावेळी त्याची बहिण कामासाठी बाहेर गेली होती. याबाबतची माहिती समजल्यानंतर बहिण तत्काळ घरी आली. घराचा दरवाजा उघडला त्यावळी अजमीर पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. यानंतर पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी अजमीरला खाली उतरून तत्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शहरामध्ये महिन्याभरात अशा प्रकारे आत्महत्या करुन जीवन संपवण्याची ही दुसरी घटना आहे. 18 फेब्रुवारी रोजी कोमपालीमध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने प्रियकराबरोबर व्हिडिओ कॉलवरुन बोलत असताना आत्महत्या केली होती.

Web Title: hyderabad news student ends life on video call with lover