
अखिलप्रिया या तेलुगू देसम पक्षाच्या वरीष्ठ नेत्या असून त्यांच्याबरोबर त्यांचे दीर आणि प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रबोस आणि इतर १५ जणांनाही अटक करण्यात आली आहे. अखिलप्रिया यांचे पती भार्गव राम फरार झाले.
हैदराबाद - तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे जवळचे नातेवाईक आणि माजी राष्ट्रीय हॉकीपटू प्रवीण राव आणि त्यांच्या दोन भावांच्या अपहरण प्रकरणी काल आंध्र प्रदेशच्या माजी मंत्री भूमा अखिलप्रिया यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. अखिलप्रिया या तेलुगू देसम पक्षाच्या वरीष्ठ नेत्या असून त्यांच्याबरोबर त्यांचे दीर आणि प्रकरणातील मुख्य आरोपी चंद्रबोस आणि इतर १५ जणांनाही अटक करण्यात आली आहे. अखिलप्रिया यांचे पती भार्गव राम फरार झाले.
'तीन युवराज कुठं हनीमूनला जातात, काय करतात माहिती नाही'
आपण प्राप्तीकर विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून चंद्रबोस हे काल त्यांच्या गुंडांना घेऊन प्रवीण राव यांच्या घरात घुसले होते. त्यांनी राव यांच्या कुटुंबीयांना बळजबरी एका खोलीत बंद करत प्रवीण आणि त्यांचे बंधू नवीन आणि सुनिल राव यांना इनोव्हा गाडीत घालून त्यांचे अपहरण केले. काही वेळाने कुटुंबीयांनी खोलीतून बाहेर पडत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ दखल घेत कारवाई सुरु केली. या दरम्यान, विकाराबाद येथील पोलिसांनी दोन संशयास्पद गाड्या अडविल्याची माहिती हैदराबाद पोलिसांना मिळाली. त्यांनी तिकडे धाव घेत तपासणी केली असता गाड्यांमध्ये प्रवीण आणि त्यांचे दोघे बंधू असल्याचे आढळले. या तिघांनी पोलिसांना अपहरणकर्त्यांबाबत माहिती दिली. आपल्याकडून काही कागदपत्रांवर बळजबरी सह्या घेतल्याची तक्रारही त्यांनी केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर कुकटपल्ली येथील एका इमारतीमध्ये छापा घालत अखिलप्रिया यांना अटक केली.
'तीन युवराज कुठं हनीमूनला जातात, काय करतात माहिती नाही'
अपहरणामागे जमिनीचा वाद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हफिजपेट येथील ५० एकर जमिनीचा व्यवहार हा या अपहरणाचे कारण आहे. हा वाद अखिलप्रिया यांचे वडिल दिवंगत भूमा नागी रेड्डी यांच्या काळापासून चालत आला आहे. हा वाद अखिलप्रिया आणि त्यांचे भागीदार सुब्बा रेड्डी यांच्यादरम्यान आहे. प्रवीण राव यांचा प्रकरणाशी संबंध नाही. त्यामुळे या अपहरण प्रकरणामुळे पोलिस चक्रावले आहेत.