तरुणीची गाडी आरोपींनीच पंक्चर केली; हैदराबादप्रकरणी धक्कादायक खुलासा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

हैदराबाद सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणाला रोज एक वळण मिळत आहे. काल या प्रकरणाला जातीय-धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जण, हा अपघात असल्याचं भासवत आहे. पण, पोलिसांनी संशयित आरोपींची चौकशी केली असता, काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपींनी केलेल्या कृत्याचा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.

हैदराबाद - हैदराबाद सामूहिक अत्याचार आणि खून प्रकरणाला रोज एक वळण मिळत आहे. काल या प्रकरणाला जातीय-धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जण, हा अपघात असल्याचं भासवत आहे. पण, पोलिसांनी संशयित आरोपींची चौकशी केली असता, काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आरोपींनी केलेल्या कृत्याचा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.

हैदराबाद अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न  

काय सांगितले आरोपींनी?
हैदराबाद पोलिसांनी संशयित आरोपींना रिमांडवर घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. त्या रिमांड रिपोर्टमधील माहितीनुसार आरोपींनी आपले कृत्य कबुल केले आहे. आरोपींनी पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये, त्यांनी संबंधित तरुणीला जाळ्यात ओढण्यासाठी तिची गाडी पंक्चर केली होती. ती गाडी पार्क करत असताना, त्यांनी संबंधित तरुणीला पाहिले होते. त्यानंतर मदतीच्या बहाण्याने त्यांनी तिला जाळ्यात ओढले. तिला मदत करण्यापूर्वी आरोपींनी दारू ढोसली होती. दारूच्या नशेत तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर संबंधित तरुणी बेशुद्ध पडली. काही वेळानंतर तिला शुद्ध आली. त्यावेळी तिचा गाळा घोटून खून केला. त्यानंतर तिला एका चादरीत गुंडाळून पुला खाली नेण्यात आले. तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळून टाकण्यात आले. असा सगळा घटनाक्रम आरोपींनी पोलिस चौकशी सांगितला आहे.

हैदराबाद 'निर्भया' प्रकरण; नागरिक रस्त्यावर, 3 पोलिस निलंबित

तीन पोलिस निलंबित
या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. प्रकरणाची नोंद करून घेण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. काल शनिवारी राष्ट्रीय महिला आरोगाच्या टीमने हैदराबादला भेट दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पीडीत तरुणीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यांना आरोपींना कडक शासन करण्याची ग्वाहीही देण्यात आली. पीडित तरुणीच्या पालकांनी पोलिसांवर या प्रकरणाचे खापर फोडले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hyderabad rape case accused punctured girls bike to assault her police inquiry