सातवीत शिकणारा मुलगा बनला 'डाटा सायन्टिस्ट'!

वृत्तसंस्था
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

- वय अवघे 12 वर्षे. 

- पद मात्र डाटा सायन्टिस्ट.

- कमी वयात साध्य झाल्याने कौतुकांचा वर्षाव.

हैदराबाद : शिक्षण आणि मेहनतीने असाध्य गोष्टी साध्य करता येऊ शकते, असे म्हटले जाते. याचा खरंच प्रत्यय आला आहे. सातवीत शिकणारा मुलगा चक्क डाटा सायन्टिस्ट बनला आहे. हैदराबाद येथील एका कंपनीने त्याची या पदावर नियुक्ती केली आहे. इतक्या कमी वयात हे सिद्ध केल्याने या मुलाचे सगळीकडे कौतुक होत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

सिद्धार्थ श्रीवास्तव पिल्ली या 12 वर्षीय मुलाने हे यश मिळवले आहे. सिद्धार्थला 'मॉन्टेनके स्मार्ट बिझनेस सोल्यूशन' या कंपनीकडून डाटा सायन्टिस्ट या पदावर निवड करण्यात आली. याबाबत सिद्धार्थ म्हणाला, की मी अनेक प्रकारच्या गेम्स खेळत होतो. त्यामुळेच मला यातून नवी प्रेरणा मिळाली. माझी इच्छा, छंद जोपासण्यासाठी मला लहानपणापासूनच माझ्या पालकांकडून पाठिंबा आणि प्रेरणा मिळाली. या कंपनीत मला नोकरी मिळणार असल्याचे समजल्यानंतर मला अत्यंत आनंद होत आहे. 

79 वर्षांच्या वस्तादाचे डाव पैलवानांना कळलेच नाही

तसेच सिद्धार्थ पुढे म्हणाला, आपल्या वडिलांच्या पाठिंब्याने कॉम्प्युटर क्षेत्रात क्लाउड कम्प्युटिंग आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये कमी वयात हे साध्य झाले. या सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करण्याचे माझे मोठे प्रेरणास्थान म्हणजे तन्मय बक्षी आहेत. कारण त्यांच्यामुळेच मला नवं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी अत्यंत कमी वयात गुगलमध्ये नोकरीला सुरवात केली. सध्या ते गुगलमध्ये डेव्हलोपर म्हणून नोकरी करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad student hired by a software company to work as data scientist