पुन्हा 'निर्भया'; हैदराबादमध्ये सामूहिक बलात्कार करून तरुणीला जाळले

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

हैदराबाद-बंगळूर हायवेवर प्रियांकाच जळून राख झालेली मृतदेह सापडला. तिचे कपडे व गळ्यातील गणपतीच्या लॉकेटवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटली व कोणीतरी तिची जाळून हत्या केल्याचे उघड झाले.

हैदराबाद : बुधवारी (ता. 27) रात्री तिची गाडी शहराच्या एका शांत भागाच पंक्चर झाली. तिने घरी फोन करून तसे कळविले. रात्री बराच उशीर झाल्याने घरच्यांनी तिला सुरक्षित जागेत थांबण्यास सांगितले. पण गाडीसोडून तिला इतर ठिकाणी जाता येईना. पंक्चर काढण्यासाठी तिने आसपास कुठे गॅरेज आहे का बघितले, तेवढ्यात बाजूच्या एरिआतील काही मुलांनी येऊन तिला मदतीची विचारणा केली. मदतीच्या बहाण्याने आलेल्या त्या मुलांनी मदत करायची सोडून तिची छेडछाड केली, बलात्कार केला अन्....

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

डॉ. प्रियांका रेड्डी... हैदराबादमधील 26 वर्षीय शिकाऊ डॉक्टर. बुधवारी रात्री बाहेरून घरी परतत असताना हैदराबाद शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या शादनगर परिसरात तिची गाडी बंद पडली. मदतीसाठी तिने बरीच शोधाशोध केली, मात्र हा भाग सुनसुना असल्याने आसपास गॅरेज दिसेना. दरम्यान तिने घरी बहिणीला शादनगर परिसरात गाडी पंक्चर झाल्याने ती अडकून पडली असल्याची माहिती दिली होती, तसेच या भागात थांबायची भिती वाटत असल्याचेही सांगितले. यावर घरच्यांनी तिला तो भाग शांत आहे, माणसांची वर्दळ तिथे कमी असते, त्यामुळे सुरक्षित ठिकाणी थांब किंवी कॅब करून घरी ये असे बजावले होते. पण गाडी सोडून न जाता आल्याने ती तिथेच थांबली. 

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर थरारक अपघात; चौघे जागीच ठार

 

 

प्रियांकाची ही हालचाल बघून व मदत करण्याच्या बहाण्याने शादनगर परिसरातील काही मुले तिला मदत करण्यासाठी तिथे आली. प्रियांकाच्या घरच्यांनी तिला कालांतराने फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन स्विच ऑफ लागत होता. दुसऱ्या दिवशी पहाटे तिने सांगितलेल्या जागेवर घरच्यांनी शोधाशोध सुरू केली, मात्र ती सापडली नाही. नंतर हैदराबाद-बंगळूर हायवेवर तिचा जळून राख झालेली मृतदेह सापडला. तिचे कपडे व गळ्यातील गणपतीच्या लॉकेटवरून तिच्या मृतदेहाची ओळख पटली व कोणीतरी तिची जाळून हत्या केल्याचे उघड झाले.

VIDEO : लोणावळ्याजवळ डेक्कन क्विनचा भीषण अपघात टळला; दोन रेल्वे समोरासमोर

शादनगर पोलिस या घटनेचा शोध घेत आहे. नक्की कोणत्या मुलांनी तिला मदत केली, त्यांनीच हे कृत्य केले का, की कोणी इतर केले असे अनेक प्रश्न प्रियांकाच्या घरच्यांसह पोलिसांनाही पडले आहेत. काल रात्री ही बाब उघडकीस आली व त्यानंतर पोलिस यंत्रणा सगळ्या बाजूने शोधकार्य करत आहे. या निर्घृण घटनेचा निषेध म्हणून ट्विटरवर #RIPPriyankaReddy हा ट्रेंड सुरू आहे. प्रियांकाच्या मारेकऱ्यांना लवकर पकडले जावे, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hyderabad veterinarian Priyanka Reddy brutally murdered and burnt