'कॅशलेस सोसायटी'साठी सहकार्य करा - मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशातील जनतेला सरकारवर विश्वास आहे, नोटाबंदीचा भविष्यात भारताला फायदाच होईल. देशभरातील नागरिकांनी कॅशलेस सोसायटीसाठी सहकार्य करावे, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदींनी आज (रविवार) नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर प्रथमच मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. त्यांनी देशाच्या विकासासाठी हा निर्णय घेणे गरजेचे होते, असे म्हटले आहे.

मन की बातमधील ठळक मुद्दे -

 • काश्मीरमधील शाळा जाळण्याच्या घटना दुःखद
 • प्रथ्येक सण जवानांसोबत सीमेवर साजरा करायला हवा
 • जम्मू काश्मीरमधील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील
 • 70 वर्षांपासून आपण सहन करत असलेल्या रोगाचा इलाज करणे सोपे नाही
 • ज्यावेळी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता, त्यावेळीच म्हटले होते निर्णय सामान्य नाही, अडचणींना सामोरे जावे लागेल.
 • जनतेकडून होत असलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो
 • अडचणींच्या परिस्थितीतही बँक आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी देशसेवा म्हणून काम करत आहेत.
 • चिथवण्याचा प्रयत्न सुरू असताना देखील तुम्ही शांत राहून या देशासाठीच्या यज्ञात सहभाग घेतला आहे.
 • सामान्यांनी श्रीमंतांच्या आमीषाला बळी पडू नये
 • काही जण आता काळा पैसा पांढरा करण्याच्या मागे आहेत
 • अशा लोकांना प्रार्थना करतो की तुमच्या पापात गरिबाला भागीदार करू नका
 • देशाच्या विकासासाठी मोठे निर्णय गरजेचे आहेत
 • तुमच्या अडचणींना मी समजतो, तरी देशहितासाठी तुम्ही निर्णय मान्य केलात
 • छोट्या व्यापाऱ्यांनी डिजीटल क्षेत्रात प्रवेश करावा, त्यांना संधी आहे
 • नोटबंदीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले
 • सामान्य नागरिकांचा पाठिंबा पाहून काम करण्यास आनंद वाटतो.
 • गाव, शेतकरी हेच आपल्या अर्थव्यवस्थेचे मजबूत स्थान आहेत
 • देशातील तरुणांनी मदत करावी, ऑनलाईन बँकिंग-मोबाईल बँकिंग कसे करतात हे आपल्या कुटुंबासह सर्वांना शिकवा
   
Web Title: I am confident that India will succeed in the demonetisation move says PM narendra modi Mann Ki Baat