बिहारमधील जिल्हाधिकाऱ्याची आत्महत्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

"मी अत्यंत हताश झालो आहे. माझा मानवी अस्तित्वावरील विश्‍वासच नष्ट झाला आहे,' असे पांडे यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे

गाझियाबाद - बिहारमधील बक्‍सर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांचा मृतदेह गाझियाबाद रेल्वे स्थानकानजीक रुळांवरच आढळल्याने खळबळ उडाली आहे.

त्यांच्या मृतदेहाजवळच एक "सुसाईड नोट'ही दृष्टोपत्तीस पडली आहे. "मी अत्यंत हताश झालो आहे. माझा मानवी अस्तित्वावरील विश्‍वासच नष्ट झाला आहे,' असे पांडे यांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. पांडे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. याचबरोबर, त्यांनी आत्महत्या नेमकी कशी केली, हेदेखील स्पष्ट झालेले नाही.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पांडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार आश्‍विनी चौबे यांनीही या प्रकाराबद्दल शोक व्यक्त करताना पांडे आत्महत्या करु शकतील, असे वाटतच नसल्याचे म्हटले आहे.

Web Title: 'I am fed up with life', wrote Buxar DM in suicide note