शशिकला यांना घाबरत नाही- दीपा जयकुमार

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

चेन्नई- अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस  व्ही. के. शशिकला यांच्या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची कोणती आवश्यकता नसून, त्यांना आपण घाबरत नाही, असे तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना दीपा जयकुमार म्हणाल्या, 'अण्णा द्रमुक विधीमंडळ पक्षनेतेपदी शशिकला यांची निवड झाली तो तमिळनाडूसाठी काळा दिवस आहे. तमिळनाडूच्या पुढील मुख्यमंत्री म्हणून शशिकला यांचा शपथविधी होणार असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. परंतु, आपण त्यांना घाबरत नाही. राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे.'

शशिकला यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यापासून अनेकांनी मला दूरध्वनी करून काळजी व्यक्त केली आहे. राजकारणातील प्रवेशाबद्दल अनेकजण विचारणा करत आहेत. परंतु, याबाबतची घोषणा 'अम्मां'च्या वाढदिवशी म्हणजे 24 फेब्रुवारी रोजी करणार आहे, असेही दीपा जयकुमार म्हणाल्या.

दरम्यान, शशिकला यांना शपथविधी घेण्यापासून रोखावे अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यामुळे त्यांचा शपथविधी होणार का, याकडे लक्ष लागले आहे. जयललिता यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकची सूत्रे त्यांची मैत्रिण शशिकला यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. जयललिता यांचे विश्‍वासू सहकारी ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे सध्या मुख्यमंत्रिपद आहे. अशा वेळी दीपा जयकुमार यांनी आपणच "एमजीआर' यांचे वारसदार असल्याचा दावा केला आहे. जयललिता यांच्या जन्मदिवशी 24 फेब्रुवारी रोजी आपण पुढील निर्णय घेऊ, असे त्यांनी जाहीर केले आहे.

Web Title: I am not afraid of Sasikala- Deepa Jayakumar