Vinod Tawde | मी आता राष्ट्रीय राजकारणात! विनोद तावडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vinod Tawde
मी आता राष्ट्रीय राजकारणात! विनोद तावडे

मी आता राष्ट्रीय राजकारणात! विनोद तावडे

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजकारणात आता सक्रीय राहणार असून, महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील, अशी स्पष्टोक्ती राज्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी केले.

राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याच्या पाश्‍वभूमीवर तावडे यांनी नवीन महाराष्ट्र सदन येथे पत्रकारांशीर संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मला २०१९ मध्ये विधानसभेचे तिकिट मिळाले नाही. त्यानंतर पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारली. आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीमचा भाग झालो आहे. आता माझी जबाबदारी राष्ट्रीय पातळीवर आहे. महाराष्ट्रात फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष चालेल. राज्यात माझे योगदान मागितले जाईल, तेव्हा नक्कीच देईल.’’

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

तीन कृषी कायदे रद्द केले म्हणजे सरकार घाबरले का, या प्रश्‍नावर तावडे म्हणाले, ‘‘कायदे मागे घेणे हे देशाच्या हिताचे वाटले म्हणून ते मागे घेण्यात आले आहेत.’’ पंकजा मुंडे या नाराज आहेत, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देणार का या प्रश्‍नावर, ‘‘पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची आवश्‍यकता आहे, असे वाटत नाही,’’

loading image
go to top