मला माफ करा ; चकमकीत ठार होण्यापूर्वी मोहम्मदचा वडिलांना फोन

वृत्तसंस्था
रविवार, 6 मे 2018

जम्मू काश्मीरच्या शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत मोहम्मद रफी भट या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय लष्करातील जवानांना यश आले. या चकमकीपूर्वी मोहम्मद भटने त्याच्या वडिलांना फोन करून मी जर तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा, असे सांगितले. 

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत मोहम्मद रफी भट या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात भारतीय लष्करातील जवानांना यश आले. या चकमकीपूर्वी मोहम्मद भटने त्याच्या वडिलांना फोन करून मी जर तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा, असे सांगितले. 

army india

दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मोहम्मद रफी भटचा खात्मा करण्यात आला. त्यापूर्वी रफीने आपल्या वडिलांना माफ करा म्हणून फोन केला होता. याबाबत मोहम्मद रफी भटचे वडील फयाज यांनी सांगितले, की सकाळी जेव्हा फोन आला तेव्हा आम्ही जागे होतो. त्यावेळी रफीने फोनवर मला सांगितले, की जर मी तुम्हाला दु:ख दिले असेल तर मी त्यासाठी तुमची माफी मागतो. त्यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी कानावर आली. 

दरम्यान, काश्मीर विश्वविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असलेला मोहम्मद रफी भट दहशतवाद्या कारवायांमध्ये नुकताच सहभागी झाला होता. आज झालेल्या चकमकीत त्याला ठार करण्यात आले. 

Web Title: I am sorry if I hurt you said son Mohammed Rafi Bhat in last call to father