मी जाती-धर्म मानत नाही : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 जुलै 2018

 ''रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीसोबत मी आहे. पीडित, चिंताग्रस्त आणि शोषित लोकांसोबत आहोत. त्यामुळे त्यांची जात-धर्म माझ्यासाठी महत्वाचा वाटत नाही''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेसला 'मुस्लिमांचा पक्ष' संबोधित करण्याच्या कथित वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) यावर भाष्य केले. ते म्हणाले, ''रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीसोबत मी आहे. पीडित, चिंताग्रस्त आणि शोषित लोकांसोबत आम्ही आहोत. त्यामुळे त्यांची जात-धर्म माझ्यासाठी महत्वाची वाटत नाही''. असे ट्विट करुन राहुल गांधींनी सांगितले.  

काँग्रेस पक्षाला मुस्लिमांचा पक्ष म्हणून संबोधित केले जात आहे. आता राहुल गांधींनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष समाजातील पीडित आणि शोषित लोक तसेच रांगेत उभे असलेल्यांपैकी सर्वात शेवटच्या व्यक्तीसोबत सदैव आहे. त्यामुळे माझ्यासाठी जात-धर्म महत्वाचा नाही. आमच्यासाठी जाती-धर्माला महत्व नाही. काँग्रेस पूर्ण मानवतेवर प्रेम करते असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ''अडचणीत असलेल्या लोकांना त्यांच्या अडचणीतून मला सोडवायचे आहे. त्यांना अलिंगन द्यायचे आहे. काँग्रेसने द्वेष आणि भीती संपुष्टात आणली. या सर्वांवर माझे प्रेम आहे. मी काँग्रेस आहे''.

Web Title: I do not believe in casteism says Rahul Gandhi