मी, पुरुषांसोबत झोपत नाही: रमेश कुमार

I Dont Sleep With Men says Karnataka Speaker Ramesh Kumar
I Dont Sleep With Men says Karnataka Speaker Ramesh Kumar

बंगळूरः कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना मी, पुरुषांसोबत झोपत नाही, असे वक्तव्य करून रमेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

15 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ काँग्रेस नेते के एच मुनियप्पा यांनी 'रमेश कुमार आणि आपण पती, पत्नीप्रमाणे आहोत. आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही,' असे म्हटले होते. यासंबंधी रमेश कुमार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'मी पुरुषांसोबत झोपत नाही. माझी एक पत्नी असून, गेल्या दहा वर्षांपासून मी विवाहित आहे. मुनियप्पा यांना माझ्यासोबत झोपण्यात रस असू शकतो, पण माझी तशी कोणतीही इच्छा नाही. माझे कोणाशीही कोणतेच संबंध नाहीत.' दरम्यान, रमेश कुमार यांच्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून, नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय, त्यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

'मुनियप्पा यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळू नये यासाठी रमेश कुमार यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यांनी अनेकदा मुनियप्पा यांच्यावर उघड टीकाही केली आहे. दरम्यान मुनियप्पा लोकसभा तिकीट मिळावी यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कोलार लोकसभा मतदारसंघतील पाचही आमदार मुनियप्पा यांना तिकीट मिळू नये, यासाठी पक्षावर दबाव आणत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com