Rahul Gandhi: 'माझ्या फोनमध्ये पेगासस होतं, अधिकारी म्हणाले सांभाळू राहा' केंब्रिजमध्ये गांधींचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi Video

Rahul Gandhi: 'माझ्या फोनमध्ये पेगासस होतं, अधिकारी म्हणाले सांभाळू राहा' केंब्रिजमध्ये गांधींचा दावा

Rahul Gandhi on Pegasus : केंब्रिज विद्यापीठात काँग्रेत नेते राहुल गांधी यांनी एक दावा केला आहे. त्यांच्या फोनध्ये पेगासस होतं आणि अधिकाऱ्यांनी त्यांना सांभाळून राहण्याविषयी सांगितल होतं, असं म्हणत त्यांनी भारतातल्या लोकशाहीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये मोठ्या संख्येने पेगासस असतं. माझ्या स्वतःच्या फोनमध्ये पेगासस होतं. मला अधिकाऱ्यांनी बोलावलं आणि फोन वापरतांना सावध राहण्याचा सल्ला दिला. कारण यामध्ये सर्व रेकॉर्डिंग होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांना केंब्रिज जज बिझनेस स्कूल (केंब्रिज जेबीएस) मध्ये पाहुणे वक्ते आहेत. त्यांनी विद्यापीठात 'एकविसाव्या शतकामध्ये ऐकणं आणि शिकणं' या विषयावर व्याख्यान दिलं.

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही एक अशा जगाची कल्पनाच करु शकत नाहीत जिथे लोकशाही मूल्य नाहीत. ही लोकशाही टिकावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. भारतातली लोकशाही धोक्यात आलेली असून लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात दखल दिली जात आहे.

'माझ्या मोबाईलमध्ये पेगासस होतं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी मला सांभाळून बोलण्याचा सल्ला दिला होता.' असा खुलासा राहुल गांधी यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Rahul GandhiCongress