मायावतींच्या राजकीय अनुभवावर पूर्ण विश्वास - अखिलेश यादव

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

'मी अनुभवावर विश्वास ठेवतो. मी मोठ्या मनाचा आहे, त्यामुळे मला जर तशी संधी मिळाली तर मला जे काही गरजेचे वाटेल त्या गोष्टी मी पूर्ण करेन'. भाजप हा विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोपही अखिलेश यांनी भाजपवर केला.

लखनौ : '2019 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आपण बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्या वय व अनुभवावर विश्वास ठेवून व अवलंबून काम करणार आहोत' असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले.  

mayawati

बसपा व सपा यांच्या युतीची भीती घालत भाजप 2019 ला सत्तेत पुन्हा येणार नाही असेही विधान अखिलेश यांनी केले. 'अखिलेश हे राजकीयदृष्ट्या कमी अनुभवी आहेत. अपक्ष आमदार राजा भैय्या यांच्यावर समाजवादी पार्टी अवलंबून राहिल्यामुळे बसपाला राज्यसभेत पराभवाला सामोरे जावे लागले.' असे वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी मायावती यांनी केले.  

राज्यसभा निवडणूकीत आम्हाला हरवण्यासाठी रचलेल्या षडयंत्रात सपा व बसपामध्ये फूट पाडणे भाजपला कठीण गेले. मायावतींच्या प्रतिक्रीयेनंतर अखिलेश यांनी सांगितले की, 'मी अनुभवावर विश्वास ठेवतो. मी मोठ्या मनाचा आहे, त्यामुळे मला जर तशी संधी मिळाली तर मला जे काही गरजेचे वाटेल त्या गोष्टी मी पूर्ण करेन'. भाजप हा विरोधी पक्षांना त्रास देत असल्याचा आरोपही अखिलेश यांनी भाजपवर केला.

 

Web Title: i have complete trust on mayavati said by akhilesh yadav