'आय एम सॉरी'; CCD च्या मालकांचे पत्र वाचा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जुलै 2019

सिद्धार्थ हे 29 जुलैला सिद्धार्थ हे बेंगळुरला येत असताना मंगळूरजवळील नेत्रावती नदीवरील उल्लाल पुलाजवळ ते कारमधून उतरले, त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

बंगळूर : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई आणि कॅफे कॉफी डेचे मालक, संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता असून, त्यांनी लिहिलेले पत्र समोर आले आहे. यामध्ये त्यांनी मी अपयशी ठरलो असून, मला माफ करा असे म्हटले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सिद्धार्थ हे 29 जुलैला सिद्धार्थ हे बेंगळुरला येत असताना मंगळूरजवळील नेत्रावती नदीवरील उल्लाल पुलाजवळ ते कारमधून उतरले, त्यानंतर ते बेपत्ता झाले आहेत. सोमवारपासून सिद्धार्थ यांचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे एस. एम. कृष्णा यांच्यासहीत त्यांचे पूर्ण कुटुंब चिंतेत आहे. सिद्धार्थ यांच्या शोधासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे.

सिद्धार्थ यांनी लिहिलेल्या पत्रात काय आहे?
संचालक मंडळ आणि कॅफे कॉफी डे फॅमिली,

37 वर्षांच्या प्रचंड मेहनतीनंतर आणि परिश्रमानंतर आपण आपल्या कंपनीत 30 हजार रोजगारांची निर्मिती करु शकलो. एक चांगला ब्रँड तयार करु शकलो. मात्र यशस्वीरित्या हा व्यवसाय पुढे नेण्यामध्ये मी अपयशी ठरलो आहे. मी माझ्या परिने पूर्ण प्रयत्न केले मात्र हा व्यवसाय तारु शकलो नाही नफ्याकडे नेऊ शकलो नाही. माझ्यावर ज्यांनी ज्यांनी विश्वास टाकला त्यांची मी माफी मागतो. सध्या कंपनीला जो तोटा होतो आहे, त्यातून मी कंपनीला सावरु शकत नाही, या गोष्टीचा मला प्रचंड दबाव आला आहे. सहा महिन्यांपूर्वी मी माझ्या एका मित्राकडून मोठ्याप्रमाणावर कर्ज घेतले. माझ्यावर असलेल्या प्रचंड दबावामुळे मला हे पाऊल उचलावे लागले. मी खूप काळ या सगळ्याचा सामना केला. मात्र मला आता हा तणाव सहन होत नाही. इक्विटी पार्टनर्सचाही प्रचंड दबाव माझ्यावर आहे.

मी तुम्हाला या पत्राद्वारे विनंती करतो आहे हा व्यवसाय आता नव्या संचालक मंडळाकडे देण्याची वेळ आली आहे. मला कोणाचीही फसवणूक करायची नव्हती. मी एक व्यावसायिक म्हणून अपयशी ठरलो आहे. मला खात्री आहे तुम्ही मला याबाबत माफ कराल. तुम्ही मला समजून घ्याल अशी खात्री आहे. कृपा करुन मला माफ करा.
- व्ही. जी. सिद्धार्थ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I have failed I am sorry wrote CCD founder VG Siddhartha in letter to staff