शंभरहून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्सः शशी थरूर

मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीः पाकिस्तानामध्येच नाही तर किमान 100हून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटले होते की, "शशी थरुर यांनी पाकिस्तानात जावे, कारण त्यांची गर्लफ्रेण्ड तिथे राहते." यावर उत्तर देताना शशी थरुर म्हणाले की, "माझ्या 100हून अधिका देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, ज्या मुली आहेत. ज्या व्यक्तीने हे विधान केले, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण ते कोणत्या प्रकारची निरर्थक बडबड करतात हे माहित नाही."

नवी दिल्लीः पाकिस्तानामध्येच नाही तर किमान 100हून अधिक देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, असे काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपूर्वी टीका करताना म्हटले होते की, "शशी थरुर यांनी पाकिस्तानात जावे, कारण त्यांची गर्लफ्रेण्ड तिथे राहते." यावर उत्तर देताना शशी थरुर म्हणाले की, "माझ्या 100हून अधिका देशांमध्ये माझ्या गर्लफ्रेण्ड्स आहेत, ज्या मुली आहेत. ज्या व्यक्तीने हे विधान केले, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, कारण ते कोणत्या प्रकारची निरर्थक बडबड करतात हे माहित नाही."

"भाजप जर 2019 मध्ये पुन्हा सत्तेत आली तर भारत हिंदू पाकिस्तान बनेल, असे झाल्यास भाजप आपल्या मनमर्जीने संविधानात दुरुस्ती करु शकते, असे थरुर म्हणाले होते. थरूर यांच्या या वक्तव्यानंतर ते भाजपच्या निशाण्यावर आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुब्रमण्यम स्वामी म्हणाले होते की, "थरुर यांना भारत सोडण्यासाठी दबाव टाकला जात नाही, तर केवळ हा सल्ला दिला जात आहे की त्यांनी पाकिस्तानात जावे, कारण त्यांची गर्लफ्रेण्ड तिथे राहते, त्यामुळे ते पाकिस्तानात जास्त आरामात राहू शकतात."