माझा जिवलग मित्र हरपला: शरद पवार

Sharad Pawar
Sharad Pawar

नवी दिल्ली : जॉर्ज फर्नांडिस हा लढवय्या म्हणून जगणारा नेता आपल्यातून गेला आहे. देशातील कामगार, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी आपले आयुष्य घालविले. मी आज जिवलग मित्र हरपला, अशी प्रतिक्रिया जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

कामगारनेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (वय 88) यांचे आज (मंगळवार) सकाळी दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालविली. जनता दल युनायटेड (जदयू) पक्षाकडून ते बिहारमधील मुझफ्फरपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 1998 ते 2004 या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते.

शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया देताना म्हटले, की जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. देशातील कामगार चळवळीला त्यांनी खरी शक्ती दिली. ते एक उत्तम संसदपटू होते. उद्योगमंत्री आणि नंतर संरक्षणमंत्री असताना त्यांची प्रशासनावर उत्तम पकड होती. त्यांचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. सार्वजनिक जीवनातील माझा वरिष्ठ मित्र मी आज गमाविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com